ll Hari Om ll
Kalichya Prabhavatun Mukt Karnara
- Sacchidananda Utsav
Like every year, Shraddhavan devotees can celebrate Shri Sacchidanand
Utsav in the Margashirsha month by bringing home the Padukas of our beloved
Sadguru Shree Aniruddha Bapu. These padukas are made from the paper pulp of the
sacred Ramnaam books.
Shraddhavans can celebrate this Utsav starting from the second Saturday
of Margashirsha month, i.e. from 14-Dec-2013 upto 15-Dec-2013 (one and half
days) or upto 18-Dec-2013 (Five days).
...... Shree Aniruddha Upasana Foundation
मार्गशीर्ष महिन्यात श्रद्धावान सदगुरु पादुका पूजनाने श्री सच्चिदानंद उत्सव साजरा करतात त्याबाबतची कथा बघूया.
द्वापारयुग संपलं आणि कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुगाच्या सुरवातीलाच एक दिवशी श्रीकृष्ण भगवंत, रुक्मीणी माता व बलराम दादा गोप गोपी समवेत बसले होते इतक्यात सर्व गोपगोपी अचानक स्थिर झाले वारयाची गती थांबली. नदी, नाले, पक्षु, पक्षी, गोपगोपी एका जागेवर स्थिर झाले. सर्वांची हालचाल थांबली,
हल्ली ज्याला आपण statue position म्हणतो तशी आणि त्यामुळे स्थितीमध्ये फक्त श्रीकृष्ण भगवंत, रुक्मीणी माता व बलराम दादा होते. हे द्रुष्य बघून बलराम दादा चिंतीत झाले व त्याने रुक्मीणी मातेला प्रार्थना केली की,
माते सृष्टीवर आलेल्या संकटापासून तूच वाचवू शकतेस, माझे सर्व गोपगोपीकेचे रक्षण कर. त्यावर रुक्मीणी माता म्हणते, अरे बलराम दादा, प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंत उपस्थित असतांना मी रे काय करणार!
तुचं भगवंताला प्रार्थना कर. त्यावर बलराम दादा म्हणतात माते भक्तीच भगवंताला प्रसन्न करते म्हणून तुचं भगवंताला प्रार्थना कर. बलराम दादाच्या प्रार्थने प्रमाणे रुक्मीणी माता श्रीकृष्ण भगवंताला प्रार्थना करते कि हे भगवंत गोपगोपीवर आलेल्या संकटाचे आपण निवारण करावे.
रुक्मीणी मातेने प्रार्थना करताक्षणीच श्रीकृष्ण भगवंत आपल्या उजव्या पायाचा अंगठा क्षणिक हलवितात व त्याक्षणी गोपगोपीची अन्य सर्वांची हालचाल पुर्ववत झाली, त्याने श्रीकृष्ण भगवंत सांगतात की आपण आता जर सर्वांची स्थिती बघितली ती कलियुगातील आहे. कलियुगामध्ये सर्वांची गती कली रोखू शकतो , मात्र जे भगवंताला शरण जातील त्याची गती कली रोखू शकत नाही व शकणारही नाही.
भगवंताच्या मुखातील हे वचन ऐकता क्षणीच रुक्मीणी माता भगवंताला प्रार्थना करते की हे भगवंत , कलियुगात भक्ताचे रक्षण होण्यासाठी एखादे व्रत सांगा, एखादा उपवास सांगा जेणे करून भक्त गण कलीच्या प्रभावापासून दूर राहातील. रुक्मीणी मातेने केलेली प्रार्थना ऐकून कृष्ण भगवंत सांगतात की आजचा दिवस हा मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा शनिवार आहे ह्या दिवशी जो कोणी सदगुरूंच्या पादुकांचे आपल्या घरी आणून पुजन करील त्याची गती कली थांबवू शकत नाही हे माझे वचन आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा शनिवारी आपण सदगुरु श्री अनिरुद्धांच्या पादुकांचे घरी पूजन करतो, म्हणजेच श्री सच्चिदानंद उत्सव.
.......... Shri Gurushetram Patrika
सच्चिदानंद उत्सवाची ठळक वैशिष्टे:
१. जेव्हां मी सदगुरुच्या पादुका घरी आणुन त्याचे पूजन
करतो तेव्हा माझ्या मनात सदगुरु प्रती, प्रेमभाव, कृतज्ञताभाव आणि शारण्यभाव
वाढीस लागतो व सच्चिदानंद श्री अनिरुद्ध
सक्रीय राहतो.
२. मार्गशीर्ष महिन्यात सच्चिदानंद
उत्सव साजरा करताना आम्ही जे पादुका पूजन करतो,
त्याने आमचा मार्ग, विकास मार्ग,
सदगुरू प्राप्तीचा मार्ग व
सदगुरू प्रेम प्रवास मार्ग सुकर होतो.
देवयान मार्गाच्या शिर्षात्वापर्यंत घेऊन जाणारा मार्गशीर्ष महिन्यातील हा सच्चिदानंद
उत्सव म्हणजे श्रद्धावानांसाठी महा पर्वणीच.
३. त्रिपुरारी त्रिविक्रम असलेले सदगुरु
श्री अनिरुद्ध माझ्या जीवनातील अशुभाचा नाश करून व शुभाचे संवर्धन करतात जेव्हा आम्ही प्रेमाने पादुका
पूजन करतो
तेव्हा आमच्या जीवनात त्रिपुरारी त्रिविक्रम असलेले सदगुरु
श्री अनिरुद्ध सक्रीय होतो व माझ्या देहातील मन,
प्राण, प्रज्ञा ह्या तिन्ही स्तरावरील अनुचितता दूर करून आमचा समग्र विकास घडवून आणतो.
अर्थात जीवनात सच्चिदानंद
उत्सव नित्यत्वाने साजरा होतो.
४. सच्चिदानंद
उत्सवातील अथर्वस्तोत्र आमच्यातील चंचलतेचा नाश करून आम्हाला गुरूतेज प्रदान करतो व परमार्थ एकाचवेळी
सुखाचा होतो.
........... Shri Gurushetram Patrika
........... Shri Gurushetram Patrika
ll Hari Om ll
ll Shree Ram ll
ll We are Ambadnya ll
No comments:
Post a Comment