Wednesday, 13 November 2013

श्रीश्वासम्



ll Hari Om ll
श्रीश्वासम्
गुरुवार, दिनांक ०७-११-१३ रोजीच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनीश्रीश्वासम्उत्सवाबद्दल महत्वाची माहिती दिली. जानेवारी २०१४ मध्येश्रीश्वासम्हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीश्वासम्चे मानवी जीवनातील महत्वही बापुंनी प्रवचनात सांगितले. सर्वप्रथमउत्साहबद्द्ल बोलताना बापू म्हणाले, “मानवाच्या प्रत्येक कार्याच्या, ध्येयाच्या पूर्ततेसाठी उत्साह सर्वांत महत्त्वाचा असतो. उत्साह मनुष्याच्या जीवनाला गती देत राहतो. एखाद्याजवळ संपत्ती असेल परंतु उत्साह नसेल तर काहीही उपयोग नाही. मग हा उत्साह आणायचा कुठून?.............

श्रीश्वासम् उत्सवाबद्दल बोलताना बापू पुढे म्हणाले, “जानेवारी २०१४ मध्ये पहिले श्रीश्वासम् हे उत्सवस्वरूपात मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक गुरुवारी श्रद्धावानांना श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीस्वस्तिक्षेम संवादानंतर श्रीश्वासम् करता येईल. श्रीश्वासम् उत्सवाच्या तयारीसाठी उद्यापासून (म्हणजे ०८-११-२०१३ पासून) मी स्वत: उपासना करणार आहे. ह्याश्रीश्वासम्साठी मी एक व्रत घेतोय जेणेकरून ज्याला ज्याला हा श्रीश्वासम् हवाय त्या प्रत्येकाला तो मिळावा...........

ह्या व्रताच्या काळात श्रद्धावानांनी मातृवात्सल्य उपनिषद मध्ये दिलेलीश्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत-नामावली:’ जेवढा वेळा वाचता येईल तितक्यांदा प्रेमाने वाचायची आहे. ह्यामध्ये कुठलाही नियम धरू नका. ही अष्टोत्तरशतनामावली म्हणून झाली की मोठ्या आईजवळ प्रार्थना करायची, “आई, माझा जो चॅनल बापूंना बनवायचा आहे, त्याच्यासाठी ह्या नामावलीचा माझ्यासाठी उपयोग करून घे.”

For detailed message kindly visit Param Pujya Samir Dada’s blog:

ll Hari Om ll
ll Shree Ram ll
ll We are Ambadnya ll

No comments:

Post a Comment