ll Hari Om
ll
“Aniruddha Pournima”
“अनिरुद्ध पौर्णिमा”
ह्या दिवसाला "अनिरुद्ध पौर्णिमा" असे नाव सौ. मीनावैनींनीच दिले. ही पौर्णिमा 'अनिरुद्ध' आहे कारण ह्याचा प्रकाश अनिरुद्धाच्या प्रेमाचा असा शीतल प्रकाश आहे, जो प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या मनामध्ये, जीवनामध्ये पोहोचतोच. दु:खाचे रुपांतर आनंद व धैर्यात करणारा हा प्रकाश आहे म्हणून मीनावैनी म्हणतात, "आता कैसी अमावास्या l नित्य अनिरुध्द पौर्णिमा".
जे मंगल आहे, शुभ आहे, जे प्रत्येक श्रध्दावानाच्या उन्नतीसाठी आणि उध्दारासाठी आवश्यक आहे ते ह्या दिवशी श्रद्धावानांना अधिक सुलभ व अधिक सहजपणे प्राप्त होते आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने श्रद्धावान ह्या दिवशी मिळणार्या बापूंच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेतात.
हा दिवस सर्वाथाने परिपूर्णच असतो. नामस्मरण, पूजन, अभिषेक, औक्षण, नैवेद्य आणि प्रत्यक्ष दर्शन अशी श्रद्धावानांना परवणी ठरणारा हा दिवस!
ll Hari Om
ll
ll Shree
Ram ll
ll We are
Ambadnya ll
No comments:
Post a Comment