Saturday 27 September 2014

सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक


|| हरि || 



दैनिकप्रत्यक्षचे कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सद्गुरु अनिरुद्ध बापू यांच्याद्वारे लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींच्याश्रीरामचरितमानसमधील सुन्दरकाण्डावर आधारिततुलसीपत्रया अग्रलेखमालेतील 1000वा लेख दि. 05-08-2014 रोजी प्रकाशित झाला. या अग्रलेखमालिकेतून श्रद्धावानांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास करण्यासंबंधी मार्गदर्शन बापु करत आहेत, दुष्प्रारब्धाशी लढण्याचे कलाकौशल्य शिकवत आहेत आणि त्याचबरोबर संकटांना समर्थपणे सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची कलाही.

तुलसीपत्रअग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांचे 1000 लेख पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑक्टोबर महिन्यातील मासिककृपासिंधुचा अंक हासहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांकम्हणून प्रकाशित करण्यात येईल, हे आपणा सर्वांना कळविण्यास आम्हाला अत्यंत आनन्द होत आहे.
या अग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांनी चण्डिकाकुलाची ओळख, स्कन्दचिह्नाची माहिती, वेदांतील विद्या, गुरु-शिष्याचे नाते, भगवान किरातरुद्र आणि माता शिवगंगागौरी यांचे सात अवतार, हळद, आवळा, जव, मोगरा यांसारख्या वनस्पतींच्या उत्पत्तीची कथा, शिव-पार्वती विवाह, स्कन्द-कार्तिकेय आणि ब्रह्मणस्पति-गणपति यांची जन्मकथा, गणपतिवाहन मूषकराज कथा यांसारख्या अनेकविध महत्त्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले.
परमपूज्य बापुंच्या द्वारे लिहिल्या गेलेल्या या सहस्र तुलसीपत्रांचे संपूर्णपणे विवरण करणे अशक्य आहे, परंतु सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांकात डॉ. योगीन्द्रसिंह जोशी यांतील काही सारभूत मुद्यांबद्दल विवेचन करतील.

या निमित्ताने बापुंनी अग्रलेखमालिकेतून केलेल्या अनमोल मार्गदर्शनाची पुन्हा एकदा उजळणी होईल. सद्गुरु श्री अनिरुद्ध त्यांच्या श्रद्धावान मित्रांसाठी जे अथक परिश्रम करत आहेत, त्यांच्या प्रेमाला दिलेला हा प्रतिसाद असेल, त्यांच्या परिश्रमांना केलेले अभिवन्दन असेल.
ऑक्टोबर 2014 मध्येकृपासिंधुचा हा विशेषांक मराठी, हिंदी इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये एकाचवेळी प्रकाशित होईल, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये हा विशेषांक गुजराती भाषेमध्येही प्रकाशित होईल ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.
- श्री. समीरसिंह दत्तोपाध्ये,
प्रकाशक, कृपासिंधु

हरि श्रीराम अंबज्ञ

- See more at: http://aniruddhafriend-samirsinh.com/sahastra-tulasipatra-archan-visheshank /#sthash.aBXLalSz.dpuf
 


No comments:

Post a Comment